Thursday, June 27, 2013

Random Thoughts...

देवानं माणसाला भूलोकात पाठविण्याआधी त्याच्याजवळ वरदान म्हणून एक रंगांचं भांडार दिलेलं असतं, शापासकट !
होय, वाढत्या वयाबरोबर त्यातील रंग कमी होत जाण्याच्या शापासकट !
बालवयात म्हणूनच माणूस बहुरंगी असतो. त्याला चित्रकार म्हणून त्याची कलाकृती हवी तशी सजवायची मुभा असते अगदी कुणा कुणाच्या लुडबुडीशिवाय… स्वतंत्रपणे !
तारुण्यात त्याच्यात एका चित्रकाराची प्रगल्भता येते. पण कुंचला मात्र सप्तरंगात आकुंचाला असतो, सोबतच चित्रात लुडबुड करणारे हातही वाढतात.
एकदा बालपणातली दुसर्यांची लुडबुड समर्थनिय व स्विकारार्ह्य असेलही मात्र तारुण्यात ती स्विकारून चालत नाही अन म्हणूनच कुंचल्यामागचा हातही तेवढाच मजबूत असावा लागतो.
आणि एकदा का ती कलाकृती पूर्ण झाली की येणाऱ्या एकरंगी वार्धक्यात त्या चित्राकडे पाहून त्याच्या सीमा गडद करण्यापलीकडे दुसरा कुठलाही आनंद असू शकत नाही.
मात्र जर कलाकृती अपूर्ण राहिली की सारखं, नकळत त्या बेरंगी भागाकडे लक्षं जातं…
मग पश्चाताप होतो,
चित्रकार असल्याचा…
रंग संपल्याचा….!


- राहुल राजेंद्र कावरे
  अमरावती 

Dedicated to My Senior Sachin Wankhade... Because of his experiences I could write this...

आज मी पेश करत असलेली ही कविता जवळपास अडीच वर्षांपूर्वीची आहे. नुकताच कवितेचा ज्वर मला तेव्हा चढला होता अन दुसऱ्यांच्या अनुभवावरून लिहिण्याची माझी ही पहिलीच वेळ होती.
म्हणूनही असेल कदाचित यात जरा निर्बुद्ध उपमा मी वापरलेल्या आहेत. म्हणून त्यात सुधारणांना भरपूर वावही आहे.
पण जशी एका नवपित्याला त्याच्या अपत्याची निर्बुद्ध,असंबद्ध बडबड ज्ञानेश्वराच्या ओविपेक्षाही गोड वाटते तसलाच काहीसा प्रकार या कवितेबाबत माझ्यासोबत आज घडतो आहे.
आणि म्हणून मी मोठ्या अट्टाहासाने यात करता येऊ शकत असलेल्या सुधारणा टाळल्या आहेत.

                                                       


प्रिये ,
उद्या तू कुठं अन मी कुठं असेन…
तुझ्या आठवणींत मी मात्र बेजार असेन….
जसा गोड पाण्यातला मासा,
खाऱ्या पाण्यात तडफडत असेन…

हे दिवस माझे आहेत, वाया घालवू नकोस…
प्रीतीला माझ्या आकर्षणाचं दूषण लावू  नकोस…
मला तुझ्या आठवणींच्या फुलांचा गजरा माळायचाय,
अन पुढं कधीतरी स्वप्नांत, तुझ्या केसांत तो गुंफायचाय.
आता फक्त तुझ्या अंगणातली आठवणींची फुलं वेचायला नाही म्हणू नको….

"तू माझी हो" असं मी म्हणणार नाही !
पण "मी तुझी होणारच नाही" असं म्हणू नको….
उद्या तू कुठ अन मी कुठ असेन…
पण एक सांगतो…
शपथेवर…
मी तुझ्यासाठी खुळा होतो…
खुळा आहे !
अन खुळाच असेन…. !!!


- राहुल राजेंद्र कावरे
  अमरावती 

Wednesday, June 26, 2013

Random Thoughts...

आत्मविश्वास आणि गर्व यामध्ये फार फरक नाही.
एका मर्यादेबाहेरचा आत्मविश्वास आपल्याला दुस्र्यावरच्या अविश्वासावरच मिळू शकतो. त्यालाच तुम्ही ' गर्व ' ही म्हणू शकता. 
आत्मविश्वास म्हणजे दुसर्यांच्या कुवतींचा आदर ठेऊन स्वत:च्या कुवातीवरचा भरवसा !
अन
गर्व म्हणजे दुसर्यांच्या क्षमता दुर्लक्षून फक्त स्वत:च्या क्षमतेचा विचार करणे… 
आत्मविश्वास अन अहमगंडात एक पुसटशी मर्यादेची रेषा असते ती एकदा दिसली की मग मनुष्याच आणि पर्यायाने समाजाचं जगणं सुखकर होईल यात तिळमात्र शंका नाही. 

- राहुल राजेंद्र कावरे
  अमरावती.  

Krunal Presents.....

मला भेटायला येते म्हणतेस ??
ये, जरूर ये… 
पण जशी आहेस तशीच ये… 
उगाच काही दाखवायला म्हणून नव्हे,   
मुद्दाम काही लपवूनही नव्हे!
फक्त प्रेमाचं अस्तित्व मला पटवायला म्हणून ये… 

येताना काहीतरी आणायचं म्हणतेस ??
आण, जरूर आण… 
पण, तुझ्याजवळ आहे म्हणून नव्हे,
अन माझ्याजवळ नाही म्हणूनही नव्हे… 
तर तुझ्या माझ्यावारल्या निस्वार्थी प्रेमाचं प्रतिक म्हणून आण… 

काही काळ इथं थांबायचं म्हणतेस ??
थांब, जरूर थांब… 
पण, विस्कटलेलं सगळं आवरायला म्हणून नव्हे,
भरकटलेल्या मला सावरायला म्हणूनही नव्हे… 
फक्त तुझ्या प्रेमाच्या धुंद वर्षावात मला भिजवायचं म्हणून थांब… 

जाताना मला माझ्याकडूनच मागायचं म्हणतेस ??
माग, जरूर माग…  
पण प्रिये,
यावेळी तरी माझ्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करू शकतेस म्हणून माग… 


- राहुल राजेंद्र कावरे, 
  अमरावती

Memories of My Engineering...

आमचा प्रोजेक्ट ग्रुप… 

इ - जनरेशन नेक्स्ट !!!