Thursday, June 27, 2013

Dedicated to My Senior Sachin Wankhade... Because of his experiences I could write this...

आज मी पेश करत असलेली ही कविता जवळपास अडीच वर्षांपूर्वीची आहे. नुकताच कवितेचा ज्वर मला तेव्हा चढला होता अन दुसऱ्यांच्या अनुभवावरून लिहिण्याची माझी ही पहिलीच वेळ होती.
म्हणूनही असेल कदाचित यात जरा निर्बुद्ध उपमा मी वापरलेल्या आहेत. म्हणून त्यात सुधारणांना भरपूर वावही आहे.
पण जशी एका नवपित्याला त्याच्या अपत्याची निर्बुद्ध,असंबद्ध बडबड ज्ञानेश्वराच्या ओविपेक्षाही गोड वाटते तसलाच काहीसा प्रकार या कवितेबाबत माझ्यासोबत आज घडतो आहे.
आणि म्हणून मी मोठ्या अट्टाहासाने यात करता येऊ शकत असलेल्या सुधारणा टाळल्या आहेत.

                                                       


प्रिये ,
उद्या तू कुठं अन मी कुठं असेन…
तुझ्या आठवणींत मी मात्र बेजार असेन….
जसा गोड पाण्यातला मासा,
खाऱ्या पाण्यात तडफडत असेन…

हे दिवस माझे आहेत, वाया घालवू नकोस…
प्रीतीला माझ्या आकर्षणाचं दूषण लावू  नकोस…
मला तुझ्या आठवणींच्या फुलांचा गजरा माळायचाय,
अन पुढं कधीतरी स्वप्नांत, तुझ्या केसांत तो गुंफायचाय.
आता फक्त तुझ्या अंगणातली आठवणींची फुलं वेचायला नाही म्हणू नको….

"तू माझी हो" असं मी म्हणणार नाही !
पण "मी तुझी होणारच नाही" असं म्हणू नको….
उद्या तू कुठ अन मी कुठ असेन…
पण एक सांगतो…
शपथेवर…
मी तुझ्यासाठी खुळा होतो…
खुळा आहे !
अन खुळाच असेन…. !!!


- राहुल राजेंद्र कावरे
  अमरावती 

No comments:

Post a Comment